Wednesday, January 11, 2012

मी धनाना पुजारी माले धन पाहिजे

सावकार ....


मी धनाना पुजारी माले धन पाहिजे
काहीच का होईना माले अमाप पाहिजे ......!!

रस्तावर्न कुत्ताल्ल भी माले हाई भुकस
येणारा जाणारा भाड़े खावु चोरी दपे छुपस.........!!

मी शे गावना ठग माले कोण लूबाडस
वावरं बत्ठा खाइगवु माले कोण जुमाडस ....... !!

मी व्यापार ना गुराखी माले व्यापार पाहिजे
काहीच का होईना माले अमाप पाहिजे ...!!

पैसा पैसा ओरडतसं हाई डेडरं सारी
शेतिले पिक नही उपास मारिनी चोरी ...!!

व्यापार ना गुनता येल शे बाजारमा
लुटी गवु लुटी गवु पैसा नही म्हजारमा.....!!

चिमनिताई ...!!
मरठी भाषांतर
सावकार
मी धनाचा पुजारी मला धन पाहिजे
काहीका होईना मला अमाप पाहिजे ...!!

रस्त्यावरच कुत्र पण मला पाहून भुंकत
येणारा जाणारा भाडे करू , चोरून लपतो ...!!

मी तर आहे गावाचा ठग मला कोणी नाही लुबाडत
सर्वांची शेती खाल्ली , मी कुणाला नाही जुमानत ..!!

मी व्यापाराचा गुराखी , मला व्यापार पाहिजे
काहीका होईना मला अमाप पाहिजे ...!!

पैसा पैसा ओरडतात इथली बेडके सारी
शेतीत पिक नाही, सोसता उपासमारी .!!

व्यापार साठी आलो बाजारात
मीच लुटून गेलो पैसा गेला उधारात !!

No comments: