Tuesday, January 10, 2012

आजची रचना आपणास गझल प्रमाणे प्रत्येक कडव्याचा

आजची रचना आपणास गझल प्रमाणे प्रत्येक कडव्याचा
वेगळा आनंद घेत वाचता येईल.
"MY इंडिया"

’पृथ्वीबाबा’ देता
कोटींचे पँकेज
अधिकारी आज
आनंदले...

निवडणूक ’त्यांची’
फसवणूक ’यांची’
अशी कष्टकर्‌यांची
स्थिती असे...

उत्तेजक बाया
T V वरी दिसे
तरूण शिकतसे
’वात्सायन...’

सिनेमाच्या नट्या
राहता ’पोटुशा’
डोहाळतो ’मिडिया’
T R P ने...

बाळंतपण फक्त
यांचीच होतात
बाकी ’जनतात’
आया-बाया...

नागवा INDIA
रस्तोरस्ती दिसे
लाज-लज्जा नसे
कोणालाही...

नव-श्रीमंतांचे
नव-चातुर्वर्ण्य
मॉल्मध्ये चरण
पडताची...

’मॉल’ आणि ’कॉल’
उ दा रि क र ण
लावते चंदन
जनतेला...

’अण्णाजी’ सांगाना
इतके करोनि
येई निवडोनि
काँग्रेसच का ?

No comments: