तुझे सूर सांगून गेले
गाव नाही बेट बुडणारे येथे
स्वरांनी छेडले ऐसे
रुतले ते काटे नव्हते
शब्दामागून शब्द ऐकले
अर्थात एकही नव्हते
फुटलेल्या कंठातून
वन्हि चे वाटणे होते
कानांनी ऐकले जे
डोळ्यात राहिले नव्हते
सोडूनी गेले ज्यांनी
बांधुनी ठेविले होते
चंद्राच्या चाकरांनी
ओरखडे आखुनी गेले
No comments:
Post a Comment