Thursday, January 26, 2012

एक होती आजी

एक होती आजी
रोज पारावर बसायची
छोट्या मोठ्या मुलांना
रोज नवीन गोष्ट सांगायची
एक होती आजी..........

कपाळी मोठ कुंकू ती लावायची
नेहमीच हसायची बोलायची
कोणावरही कधीच नाही रुसायची
रडणा-याला नेहमीच ती हसवायची
एक होती आजी..........

कितीही काम असल तरी
नाही ती थकायची
ओरडायची मारायची
पण गोड पापी द्यायला कधीच नाही विसरायची
एक होती आजी..........

कोणी आजारी पडता, बटव्यातून
वेगळच औषध ती काढायची
मायेचा हात ती नेहमीच फिरवायची
देवाने नेले तिला,
कारण त्यालाही ती खूप आवडायची
एक होती आजी..........

No comments: