Thursday, January 12, 2012

आला वसंत तेव्हा मोका टळून गेला

आला वसंत तेव्हा मोका टळून गेला,
मी जागलेच नाही अन् तो हळहळून गेला.
सारेच शब्द माझे आले पुढे परंतु
हा अर्थ ऐनवेळी का गोंधळून गेला.

चालली वाहून कोठे नाव ही माझी कळेना,
चालली 'मी' कुठे अन् राहिला कोठे किनारा.
तू दिलेल्या यातनांचे मी जरी काहूर होते,
जीवना रे सांग केव्हा मी तुला मंजूर होते.

तापलेला माळ सारा मी कुठे शोधू किनारा,
सावली माझीच मागे पोळली याचा पुरावा.
हा उमाळा कोणता जो येत आहे धोरणांनी,
हा जिव्हाळा कोणता जो राखतो आहे दुरावा..

No comments: