दिव्य शक्ती
ओंजळीत तुजीया, फुलांनी गर्दी केली ,
गंध पसरला मोगर्याचा ,
वेणी मध्ये अडकली , भान हरवून गेली ,
विसर पडला जगाचा ,
मोगार्यासम तू , मधाळ गंधाळ लेली ,
तुझ्या मिठीत न्हावी, रात्र अंधारलेली ,
किती पाहावे भावूक , डोळे बोलणारे ,
शब्द अंतरीचे, पापणीत सांडणारे ,
गुलाबापरी राक्त्पिर्णी, ओठांचे बहाणे ,
अदा मादक तयांची , क्षणात जीवघेणे
श्वास उबदार , मज आर्त साद देई ,
येऊन तू मुक्याने, अलगद मिठीत गेई
मी अधीर अधीर , जणू पाऊस दाटलेला
ओल्या तुज्या मिठीने, मी चिंब चिंब भिजलेला ,
तुझ्या बेभान सरींचा, पाऊस बरसणारा
वेचण्या तृप्त गारा, मी अवखळ बिलगणारा,
मुके झाले शब्द सारे, श्वास बोलू लागले ,
तुझे माझे गोड उसासे , एक स्वप्न सजवू लागले ..
No comments:
Post a Comment