होते स्वतंत्र, मजला, वृत्तात बांधले मी
कृत्रिम या जगाशी संधान साधले मी
अस्तित्व आज माझे, दुनिया निघे पुसाया
आईसवेच माझ्या गर्भात भांडले मी
रूढी परंपरा अन् शीलास झेलताना
काट्यास त्या भुकेच्या बेहाल गांजले मी
होती शिकावयाला बंदी मलाच केली
बाराखडीत माझ्या ध्येयास मांडले मी
क्रांतीस पेव फुटले, ठिणगी सवे भडकली
पाठीस मुल होते, रक्तास सांडले मी
No comments:
Post a Comment