Saturday, January 28, 2012

करतेय मी तिरस्कार मित्र शब्दाचा ,
तेव्हापासून ,जेव्हा तो म्हणाला मला
विसर आज पासून आपल्यातल्या
त्या सर्व संबंधाला -त्या नाजूक नात्याला
थांबव रंगवायचे माझ्यासह संसाराचे चित्र
या पुढे आपण दोघे राहू फक्त एकमेकाचे मित्र

*******************************

दोन सावल्यांची मिसळलेली
एक अकृती नदीकाठी
आणि पापणीच्या क्षितिजावर
दुर संध्याकाळ हुरहुरत होती

*******************************

झाली पुन्हा संध्याकाळ
आला आठवांचा फराळ
हास्याचे रडण्याचे ते क्षण पाहून
बावळ हे मन बसल त्यांच्यात जाऊन

*******************************

नाही तुझ्या मनाचे नाही माझ्या मनाचे
होईल काही जे ते येईल त्या क्षणाचे
हातात काय आहे, उरणार शेवटाला
पाहु मरुन दोघे, रुजतील श्वास सा

No comments: