Sunday, January 8, 2012

का असे तू प्रेम..

का असे तू प्रेम करते तात्पुरते..!
लांबुनी पाहून हसते तात्पुरते....!
आवडे त्याची अदा झालो फिदा पण...
ती सदा स्वप्नात असते तात्पुरते....!

***********************

तोडायचीच होती तर
मैत्री केलीस कशाला ..
सोडायचीच होती अर्ध्यावर
तर साथ दिलीसच कशाला .

***********************

कधी कधी माझेच
शब्द माझ्याशी
अबोला धरतात
तुला कवितेत घेत नाय
मानून उगाच रुसून बसतात

***********************

बेईमान अश्रू !

नेहमीचे माझे सखे सोबती झाले अश्रू
दुखातही सुखातही सोबतीला आले अश्रू
तू जाताना रडायचे नव्हते रे .........
पण नेमके त्याच वेळी बेईमान माझे झाले अश्रू

No comments: