Monday, January 23, 2012

आता मला न राहायचे

आता मला न राहायचे
शोषून घे जे पाहिजे

सोडू नको तू काहीही
आळ नको ते जगायचे

मला न आता उरायचे
विरहाचे नको दाह ते

घे आवळून आभाळ ते
मला नाही उडायचे

आली ती वेळ मिटायची
क्षितीजाने सांभाळायची

थांबू नकोस तू आता
मावळू दे उसासा

उधळून घे रंग तुझे
झाली वेळ दडायची

तू अथांग शर्वरी
लाटून घे मला अंतरी

No comments: