हातांची मनगटे कडक झाली ....
मुठी आवळल्या
अन फुगवली छाती चार इंच ...
अभिमानाने ...
तारुण्य असे इशाऱ्यात भरले अन...
फोडला एकदाचा आवाज पोलादी ...
" भारत माता कि जय "
घुमला अनंतात ,
पसरला सर्वदूर ,
अन परतही आला माझाकडे ...
माझा पोलादी आवाज
वाटले घुसेल अनेक मस्तकात आता ...
माझा पोलादी आवाज ...
अन बसेल चपराक अन्यायाला ...
उठून पळेल येथून अन्यायाचे भूत ..
परंतु ...
हे काय ...
इथे भयानक आहे काहीतरी ..
माझ्या पोलादी आवाजाहून भयानक ..
अन गिळते आहे ते अनेक तरुण माझासारखे ...
हे काय इथे ?
असे संपतेच कसे यांचे तारुण्य फुकटात ...?
हे तर नपुंसक होत आहेत ...
अन दिशाहीन सुद्धा ......
कळत कसे नाही यांना ?
हे तरुण सर्व ...अबोल का झालेत ?
इथे भयानक आहे काहीतरी ..
दहशत आहे त्याची कि काय ...?
काही मूठभर लोकांनी यांना ..
मारलय , लुटलाय , ओरबाडलय , जखमा दिल्यात ..
तरी हे असंख्य असे निष्क्रिय का ?
माझासोबात आता असेल का कोण पुन्हा आवाज द्यायला ?
इथे इतकी शांतता का आहे ?
माझ्या आवाजाला काय झालाय ?
तो निघत का नाहीय ?
होय तो पोलादी आहे ...
पण फुटत का नाहीय आज ?
कंठ दाटलाय का माझा ?
हे कोणते अपंगत्व आहे ?
हातांची मनगटे मलूल आहेत
मुठी आवळत का नाहीत आता .....
No comments:
Post a Comment