जर माती म्हणाल मला
द्या बागेत जागा तिला
येईल फुल वेगवेगळे
मग म्हणा गंधित राहू दे मला
जर दरिद्री म्हणाल मला
द्या दु:ख ओंजळीने
जपेन मी वेदनेला
मग म्हणा संत मला
जर सोलीन म्हणाल मला
द्या जागा वहाणेची
मग चालत जा तुम्ही
आणि म्हणा जप मला
जर वंचित म्हणाल मला
द्या पडीत मला इतुके
सगळे जमून एकदा
मग म्हणा जागव मला
जर वृद्ध म्हणाल मला
घ्या चालून अंगावर इतुके
दिशाहीन झाल्यावर एकदा
म्हणा दाखव सूर्य मला
जर भोगा म्हणाल मला
करा अत्याचार इतुके
श्रांत होऊन एकदा
म्हणा देवळात राहू दे मला
No comments:
Post a Comment