Tuesday, January 24, 2012

एक खरी छोटीशी प्रेम कहाणी, must read..

एक खरी छोटीशी प्रेम कहाणी, must read..

आमच्या junior college मध्ये एक मुलगी होती..
खूपच सुंदर, निळे डोळे, ओठांवर एक निरागस हसू, गालावर खाली, सोन्यासारखा कांती होती तिची...
जणू काही ती एक अप्सराच होती.. हो, खरच... सगळ्या मुली तिच्यावर जलायच्या.. आणि सगळे मुले तिच्यावर जीव ओवाळून टाकायचे.. पण ती मात्र स्वत:तच गुंग असायची..एक मुलगा तिला आवडायचा.. handsome dashing बोल्ड असा होता तो... तिला साजेसा.. योगायोगाने त्यालाही ती आवडायची... फिदा होता तो तिच्यावर... ते दोघे made for each other होते...
तो तिला propose करणार होता... rose day होता त्या दिवशी.. त्याने तिला एक मोठा red roses चा बुके दिला.. आणि सर्व college समोर तिला तो i love you म्हणाला... ती हलकेच लाजली, आणि हो म्हणाली... तेव्हा त्याने अख्या कॉलेज ला सामोसे खाऊ घातले होते.... propose करताना तो तिला म्हणाला " आयुष्यात अगदी काहीही झालं तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही.. दुसऱ्या कुठल्या मुलीकडे कधी वळून सुद्धा बघणार नाही.. जर देवाने मला माझ्या life मध्ये आणि तुझ्या मध्ये जर काही choose करायला सांगितलं तर मी तुलाच choose करेल.. तू फक्त माझी आहेस.. गर्दीत तुला हरवू देणार नाही, तुझा हात कधीच हातातून निसटू देणार नाही.. " ती म्हणाली, " मी सुद्धा तुझ्यावर तितकच प्रेम करते.."
एक दिवस ती गाडीवरून घरी येत होती, कानात headfone त्याचाशी बोलत होती.. बोलण्याच्या नादात तिला ट्रक चा होर्न ऐकूच नाही आला, आणि accident झाला.... खूपच severe होता तो... त्यात तिचा डावा पाय ट्रक च्या खाली आला, आणि चुराडा झाला पायाचा... डोक्याला खूप लागला.. खूप रक्त गेला... ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.. घरच्यांनी तिला हॉस्पिटल ला नेला.. डॉक्टर ने सांगितलं कि पाय पूर्णच गेलाय.. artificial पाय बसवावा लागेल.. इतका वेळ ती बेशुद्ध च होती.. ती शुद्धीवर आल्यावर तिला कळाल कि तिला दुसरा पाय बसवलाय..
तो तिला भेटायला गेला होता.. त्याला फार वाईट वाटला.. पण तिने त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल प्रेम नाही तर सहानुभूती पाहिली... नंतर हॉस्पिटल मध्ये तो तिला भेटायला यायचा.. पण खूप कमी बोलायचा.. एकदा तिने हिम्मत करून विचारला, " तू असा का वागतो आहेस?? काय झालाय तुला??? " तो म्हणाला, " मला नाही वाटत कि मी हे relationship टिकवू शकेल पुढे... आपण break up करून टाकू??" ती म्हणाली, " तू पण इतरांसारखाच आहेस... तू तर म्हणाला होतास कि काही झालं तरी माझी साथ सोडणार नाहिसं... मग आता काय झालं??? का ते प्रेम पण खोटं होतं???"
तो म्हणाला, " be practical यार, मी तुझ्यासोबत आता माझा सगळं आयुष्य कस काढणार??"
शेवटी तो तिला सोडून निघून गेला,. कायमचा...
का नाही जाणार??? तो practical होता.. असं पण be practical चा जमाना आहे..
जो असं वागत नाही त्याला पश्चातापाशिवाय काहीही मिळत नाही...

No comments: