Friday, January 6, 2012

वाट लागली डोक्याची

वाट लागली डोक्याची

ती माझ्याकडे येता जाता
नेहमी एकटक पाहायची
मी रस्ता बदलला तरी
त्या रस्त्याने सुद्धा असायची !

मी तिच्याकड नाही पाहिलं तरी
तरी माझ्याकडच पाहायची
कारण विचारायचं म्हणून
जागा ठरवली भेटीची !

भेटायचं म्हटल्यावर तिला
रंगरंगोटी केली चेहऱ्याची
गाडी सुद्धा आणली दुसऱ्याची, अन बूट घातली तिसऱ्याची
वाट पाहून पाहून तीची, वाट लागली माझ्या डोळ्यांची!!

सक्काळी ९.३० ला आलेलो मी
वेळ झालेली दुपारी साडेचारची
मी तिथून निघणार
तेवढ्यात स्वारी आली रानिसाहेबांची!!

कारणमिमांसा विचारली
मी तिला उशिरा येण्याची
ती म्हणाली तय्यारीच होत नव्हती
माझ्या थोरल्या बहिणीची !

हे ऐकून भट्टीच शांत झाली राव
माझ्या बडबडनाऱ्या तोंडाची
आग , बावळे आपल्या दोघामध्ये
काय गरज होती तुझ्या बहिणीची !!

काय सांगू देवा तुला
माझी बहिण आहे फक्त एकतीस वर्षाची
रात्रंदिवस काळजी वाटते आई बापाला
तिच्याच लग्नाची !!

मी म्हटलं ठीक आहे
मग इथे काय बोलणी करायचीत का तिच्या लग्नाची?
ती म्हटली हो ! त्यासाठीच
हिम्मत केली तुझ्याशी बोलण्याची!!

मी म्हटलं वाह ! मी तर
एका पायावर उभा आहे वरमाला घेऊन लग्नाची
ती म्हटली कित्ती बर होईल जेव्हा तो क्षण येईल
जेव्हा तुम्ही मला जागा द्याल तुमच्याच "मेव्ह्नीची" !

तेव्हा मी तिला म्हटलं
मी निघतो आत्ता माझी वेळ झाली गोळ्यांची
त्या दिवशी मला कळल इतके दिवस
ती मला एकटक का पाहायची !

वाट लागली राव माझ्या डोक्याची !!! वाट लागली राव माझ्या डोक्याची !!

No comments: