Tuesday, January 31, 2012

डोळ्यात मी तयांच्या खटकून जात आहे

डोळ्यात मी तयांच्या खटकून जात आहे!
वाटाच बंद झाल्या भटकून जात आहे!!

हे भ्रष्ट लोक आता मज मारण्यास आले!
सर्वाँस मी इथेची झटकून जात आहे!!

झालेत संथ सारे पण मी न संथ झालो!
युध्दात मी तयांना पटकून जात आहे!!

माझे कुणी न झाले सगळेच दूर गेले!
माझ्यासमोर मृत्यू मटकून जात आहे!!

माझ्या जिव्हेस झाला लखवा असा कसा हा!
आवाज आज माझा अटकून जात आहे!!

आहे उभा कडेला दरी खोल फार आहे!
पायांसही न कळले सटकून जात आहे!!

No comments: