तू परतोनी मागे यावे
वाट पाही हा किनारा
अजूनही वन्ही पेटतो
धुम्र उठे नभी सारा
लाटा उसळती भेटण्या
चंद्र यावा भेटणारा
ओढ वाढे त्वरा यावे
मनाचा कंदील पेटणारा
साकारतो छत उन्हाचे
सावलीने हात द्यावा
बंध छाया सहोदरीची
वाहे मुक्त झाकणारा
नभ नेती वारे घरचे
दर्यावरती भेटणारा
काटे उमलती आठवणींचे
गुलाब यावा भेटणारा
No comments:
Post a Comment