आहे जरी हे जीवन भंगुर का धावतो उमगेना मला
स्वत स्वताला विसरून वेड्या शोध घेशी पुन्हा पुन्हा
जगलास का रे होऊन स्वताचा ,हसलास का कधी स्वत साठी
विसरून गेलास जगणे सारे या जगण्याचा वेडा पायी
आहेस कोण तू जगतोस का रे विचरून पहा एकदा तरी
गेलास तू जरी फरक पडेल का पूस एकदा जना मधी
माझे माझे करूनच मेलो जगलो नाही स्वत साठी
का?कशाला घाट का सगळा वर्थ सारे क्षणा साठी
माझी नाती,माझी गोती ,हे माझे आणि ते पण माझे
जातो जेव्हा शरीर सोडून पाठ फिरवती हेच ते सारे
मग आठवती भूक सर्वाना,उपाशी राहील कोण तुझा साठी
म्हणून गेले म्हणूनच कोणी हाय करती क्षणा साठी
आजून हि थांब फिरुनी पहा थोडा जग स्वत साठी
स्वताला समजून घे आधी थोडे मग धाव जना साठी
मरण का चुकले कोणा जातील सगळे सोडून सारे
तरी पाहून रोज जरी हे उमगे ना आम्हा हे कोडे .....
No comments:
Post a Comment