Sunday, January 15, 2012

नंतर केव्हातरी जगेल

बरेच प्रश्न पडतात पण
उत्तरे काही सापडेना !
आयुष्य एक कोड आहे पण
ते काही केल्या उमजेना !!

आई म्हणते जगन्याचा
दृष्टिकोन बदलायला हवा !
बाबा म्हणतात आपला रस्ता
आपनच शोधायला हवा !!

आई म्हणते सर्वाँशी
प्रेमाने तू वागत जा !
निष्ठुर आहे जग पण
तू आपुलकिने जगत जा !!

बाबा म्हणतात आता तू
जीद्दीने लढायला हवं !
आयुष्य एक शर्यत आहे
तूला जिँकायलाच हवं !!

प्रेम आणि जीद्दीची
ही गं कसली लढाई ?
विचार माझे स्तब्द होतात
हे कुणाला गं सांगु आई ?

विचारचक्रावर या
मी कसा मिळवू ताबा ?
जिँकेल सा~या जगास
थोडा विश्वास ठेवा बाबा !!

खरच सांगु आई आज
खुप भीती वाटतेय गं !
मी फक्त एक थेंब आणि
जीवन आहे सागर गं !!

बाबा तुमच्या स्वप्नांसाठी
मी दिवस-राञ झगडेल !
माझ्या स्वप्नांसाठी माञ
नंतर केव्हातरी जगेल !!

नंतर केव्हातरी जगेल . . . . .!!

No comments: