Sunday, December 4, 2011

तुला पहिले मी,

तुला पहिले मी,
अंधारातून जाताना...
माझ्या सावली बरोबर,
फक्त तुझीच सावली चालताना...

तुला पहिले मी,
चंद्र कडे पाहताना...
माझ्या कडे पाहून,
गोड गोड हसताना...

तुला पहिले मी,
स्वप्नाच्या विश्वात रमताना...
त्याचं बागेत,
त्याचं झाडा खाली,
माझ्या शेजारी असताना...

तुला पहिले मी,
आयुष्याच्या प्रत्येक क्षणा-क्षणाला...
तू नसूनही,
तुझ्या त्या आठवणीन मध्ये झुरताना...

तुला पहिले मी,
रोज मनी रडताना...
अन,
देवाकडे फक्त,
तुलाच परत मागताना...

देवाकडे फक्त,
तुलाच परत मागताना...

No comments: