पुष्कळदा ठरवतेस सान्गाव तुला
पण मला धीरच होत नाही
मनातल सार मनातच राहत
ओठान्वर काही ते येत नाही...
... अशी कशी मी हाक देऊ
सोप वाटतय का ते तुला
जगाची रीत मनातली प्रीत
सगळ्याचा विचार करायचाय मला...
म्हणुनच अपेक्षा करत राह्ते
तुच काहीतरी बोलण्याची
खर तर मीही वाट बघतये
तुला प्रतिसाद देण्याची...
माझे शब्द नाहीत महत्वाचे
भावना तर कळाल्या ना तुला
सगळ्याच गोष्टि सान्गता येत नाही
थोडस समजुन घे की रे मला ♥♥♥
No comments:
Post a Comment