Tuesday, December 27, 2011

बाहूत त्यास घेता देहास आग लागे

बाहूत त्यास घेता देहास आग लागे
अणुरेणु पेटताना प्रेमास आग लागे

वातावरण शहारे ती गोड लाजताना
लपवून तोंड बघते बेतास आग लागे

नाजूक हात दोन्ही मेंदीत रंगलेले
दूरून पाहताना नेत्रास आग लागे

घेऊन सूर जेव्हा आलो तुझ्याच दारी
ओठात गीत गाता नजरेस आग लागे

नजरेतली नजाकत कवटाळतच साबिर
स्वप्नात भावनांच्या मेणास आग लागे

No comments: