Wednesday, December 7, 2011

हीच का ती झिंगलेली रात आहे

हीच का ती झिंगलेली रात आहे
थांब चंद्रा पेंगलेली जाग आहे

आज तो वणवा असा का पेटलेला
ही युगांची धुमसती गे आग आहे

काल तू नटली अशी की मैफीलीला
लोक देती दाद ती "क्या बात आहे"

रोज येती राजनेते भेटण्याला
ही भिकार्‍यांचीच आली साथ आहे

मी सखी अन् तू सखा तो आसमानी
या जीवाची त्या शीवाला साद आहे

वाळुचा रे तो बिछाना चांदराती
खवळत्या रे सागराची गाज आहे

वेळ वेळी वळवळे तो षंढ काटा
हीच वांझोट्या कलीची प्यास आहे

No comments: