Monday, December 5, 2011

का रे......तू असं का केलंस...?

का रे......तू असं का केलंस...?
देऊन सगळे मला.....असं परत का नेलंस..?
सवय होती तुझी मला...
"कदाचित" माझीही झाली होती तुला...
तुज्यात मी गुंतत गुंतत गेले,
आयुष्याचे सगळे क्षण तुला होते दिले..
एकदा तरी विचार करायला हवा होतास...
तू जसा आहेस...तसाच्या तसा मला हवा होतास
मला नाही दिसतंय वाट...तू कशी शोधलीस रे?
मला नाही सुटतंय ती गाठ....तू कशी सोडलीस रे?
गाठ कधी पडली हे मला कळलंच नाही रे,
एकदम सहज सोडलीस.....सोडताना तुजं काही अडलंच नाही रे....
इतका त्रास देऊन सुद्धा मन माझं तुज्यासाठी रडतंय,
चुकलंय का माझं काही?....सगळं असं मनाविरुद्ध घडतंय,
आत्महत्या करायचा विचारही येतो,पण हिम्मत होत नाहीयेय,
"नाही करायचा विचार"...हजारदा ठरवते....पण जमत नाहीयेय.
तुज्या साठी मी.......स्वतःला बदललं,
माझं जग वेगळं होतं रे आधी....मी तेही बदललं
आठवले सगळे ना कि....जीवाने आकांत करतेय
मजा नाही जगण्यात....मी फक्त दिवस ढकलतेय...
सगळे क्षण....ओल्या डोळ्यांत साठतात...
आठवणी गर्द मनात दाटतात.....
म्हणून आयुष्याची काही पुस्तकं मला बंदच बरी वाटतात....!!!!!!!!

No comments: