Friday, December 9, 2011

श्वासात श्वास माझा

श्वासात श्वास माझा
श्वासात श्वास माझा फसला कधी कळेना
ह्र्दयात घाव त्याचा जपला कधी कळेना

वदला कधी न माझा मुखचंद्र येत जाता
अवचीत ओठ माझा हसला कधी कळेना

शेजेवरीच माझ्या रुसला सखा अवेळी
लाडीक राग त्याचा सरला कधी कळेना

झाली तना मनाची जवळीक,काय सांगू
हलकेच तो कुशीला वळला कधी कळेना

खेळात खेळ त्याचा खेळीत यार गेला
डावात आज माझ्या हरला कधी कळेना

No comments: