Thursday, December 29, 2011

वैर हे निशेतले राहणे दूर ते

वैर हे निशेतले राहणे दूर ते
तुझ्याच हाती सूर ते जगायचे मारायचे

तो चाले खेळ तमातला ती आस हि नभावरी
उतरो बिंब अंगणी जगायला मारायला

राहे किती दूर हे चंद्र आणि चांदणे
अंग संग तू करी जगायला मारायला

विरह ते शिरजोर हे हळूहळू सरायला
तुझे निकट वार ते जगायला मारायला

त्यागी तू पैगाम जे पाठविसी स्वैर ते
पारवे तुझे किती जगायचे मारायचे

मला नको अशेष जे विष आहे कल्पना
बाहुपाशी दे श्वास जगायला मारायला

No comments: