Sunday, December 11, 2011

जिच्यासोबत चालताना जग परकं व्हावं

जिच्यासोबत चालताना जग परकं व्हावं,
गुलाबी थंडीत कुणी आपलंसं वाटावं,
थांबावं तिच्यासाठी Ice-cream घेताना,
हट्ट असावा तिचाच इच्छा माझी नसताना ।।

पावसात ice-cream खाल्याने सर्दी मग व्हावी
चिंतेच्या डोंगरावर मग तिच उभी रहावी ।।

वाटेवर आयुष्याच्या वाटतं तिचीच साथ असावी
अशीच काहीतरी प्रेयसी माझी असावी ।।

No comments: