Wednesday, December 28, 2011

नातं तुझं नि माझं

नातं तुझं नि माझं
फुल अन सुगंधा सारखं
जरा सांग,
फुल उमलता सुगंधाला सोडून जाईल का?

प्रेमाचे दोन शब्द
आठवतात जे मला
जरा सांग,
तेच तुला आठवतील का?

आठवण माझी आल्यावर
जरा सांग,
मनाला तुझ्या अश्रुंच्या पावसात
माझ्यासारखी भिजवशील का?

कधी आयुष्याच्या
त्या अवचित वळणावर
जरा सांग,
एकदा परत भेटशील का?

No comments: