Wednesday, December 28, 2011

स्वामी समर्थ आलो आज तुझ्या दारी

स्वामी समर्थ आलो आज तुझ्या दारी
झोळी पसरुनी उभा हा भिकारी

नाना दु:खे भोवताली नशिबी आले
प्रसंग जीवघेणे खुपसे झाले
दिली हाक चारी दिशा मीच लाचारी
झोळी पसरुनी उभा हा भिकारी

दर्शनाचे भाग्य लाभो माझ्या जीवनी
भावनांचा भार रंगलेल्या भजनी
माझ्या पाठी स्वामी आस राही तोवरी
झोळी पसरुनी उभा हा भिकारी

स्वामी समर्थ जीवनाला तारणारे
पीडितांची हाक येता धाव घेणारे
आसवांचा पूर श्वास आहे जोवरी
झोळी पसरुनी उभा हा भिकारी

स्वामी समर्थ आलो आज तुझ्या दारी
झोळी पसरुनी उभा हा भिकारी

जय-जय स्वामी समर्थ

No comments: