Friday, December 30, 2011

कुणाला इतकाही वेळ देवू नये

कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी !
तडकलेच जर हृदय कधी
तर जोडताना असह्य यातना व्हावी !!

स्वप्नांत कुणाला इतकही पाहू नये
की आधाराला त्याचे हात असावे !
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या काहिच नसावे !!

कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर
त्याचा अधिकार व्हावा !
एक दिवस आपनच आपला चेहरा
आरशात परका पहावा !!

कुणाची इतकीहि ओढ नसावी
की पदोपदी त्याचीच वाट पहावी !
त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी !!

कुणाचे इतकेही एकू नये की कानात
त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा !
आपल्या ओठांतूनही मग
त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा !!

कुणाची अशीही सोबत नसावि
की प्रत्येक स्पंदनात ती जानवावी !
ती साथ सुटन्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन आश्रु जमावि !!

कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे 'मी पण' विसरून जावे !
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला
ठेच देवून जागे करावे. . . .!!!!

No comments: